संस्थेचे व्यवस्थापन

संस्थेचे व्यवस्थापन :- 

              संस्थेचे कारभार प्रधान कार्यालय व तिच्या ९ शाखांमार्फत पहिला जातो. प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी संस्थेचे शाखा कार्यालय आहे .

संस्थेचे व्यवस्थाप मंडळ :-

              प्रत्येक तालुक्याला एक असे रत्नागिरी जिल्ह्याचे ९ तालुक्यासाठी ९ प्रतिनिधी निवडले जातात. तसेच सर्वसाधारण राखीव १, मागास वर्गीय प्रवर्गाकरिता करिता १ , इतर मागास वर्गीय प्रवर्गाकरिता करिता १, विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष प्रवर्ग प्रवर्गाकरिता करिता १, महिला प्रतिनिधी करिता २ अशा पाच जागा राखीव असून त्यासाठी संपूर्ण जिल्हा मतदारसंघ आहे. एकूण १५ संचालकांचे, २  तज्ञ संचालक व कार्यलक्षी संचालक १ असे १८ सदस्यांचे व्यवस्थापक मंडळ असून दर ५ वर्षांनी निवडणूक घेतली जाते. पदाधीकारी निवड निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे मार्फत केली जाते.

 

शाखा कार्यालये :-

       संस्थेने तीच्या तालुकावार शाखांसाठी स्वतः च्या मालकीच्या जागा घेवून शाखा कार्यालय सुरु केली आहेत. सर्व शाखा कार्यालये सभासदांना सोयीच्या दृष्टीने उपयुक्त साध्य होत आहेत.

संगणक व्यवस्था  :-

           शाखा कार्यालयातील कामकाज पूर्णतः संगणीकृत करण्यात आलेला आहे. यावर सभासदांचे संपूर्ण खाते व्यवहार घेण्यात आले असून  सभासदांचे दरमहाच्या वसुली याद्या संगणकाद्वारे तयार केल्या जातात . व्याज आकारणी, डिव्हीडंड आकारणी, वार्षिक हिशोब संगणकाद्वारे तयार केले जातात . सभासदांचे संगणकामुळे आज कामकाज अत्यंत सुलभ झाले आहे.